स्‍पर्धा परीक्षा एक चिंतन

1

 स्‍पर्धा परीक्षा एक चिंतन 

     आधुनिक जग हे स्‍पर्धेचे आहे.  स्‍पर्धेत उतरल्‍याशिवाय विदयार्थ्‍याला निश्चित ध्‍येय गाठता येत नाही. भावी आयुष्‍याची जडणघडण करण्‍यासाठी विदयार्थ्‍याला आपल्‍या विदयार्थी जीवनातच विविध स्‍पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. तसे प्रत्‍येक विदयार्थ्‍याने आपले जीवन सुखकर करण्‍यासाठी निश्चित ध्‍येय गाठण्‍यासाठी स्‍पर्धेला सामोरे गेलेचा पाहीजे. जो कोणी विदयार्थी आपल्‍या विदयार्जनाच्‍या काळामध्‍ये विविध स्‍पर्धा परीक्षा देतो. तो आपले ध्‍येय गाठतो. आपले अस्तित्‍व निर्माण करतो. त्‍याला समाजात नक्‍कीच सन्‍मानाचे, प्रतिष्‍ठेचे, सफल जीवन प्राप्‍त होते.
शिक्षणाने केवळ साक्षर होऊन चालणार नाही ; तर एक सुजाण कर्तव्‍यदक्ष जबाबदार नागरीक घडला पाहीजे. देश, समाज सेवेसाठी झगडणारा नागरीक तयार झाला पाहीजे. देश सेवेसाठी कुशल मनुष्‍यबळ निर्माण करणे हे शिक्षणाचे मोठे उद्दिष्‍ट आहे. आपले जीवन यशस्‍वी करण्‍यासाठी विदयार्थ्‍याला मुळापासून म्‍हणजे अगदी लहान वयापासूनच स्‍पर्धां परीक्षांना सामोरे गेले पाहीजे.
शासकीय पातळीवर प्राथमिक स्‍तरापासूनच विदयार्थ्‍याचा बौध्दिक विकास होण्‍याच्‍या दृष्‍टीने अनेक प्रकारच्‍या स्‍पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात आहे. उदा. इ. 3 री पासून ते उच्‍च शिक्षणापर्यंत अनेक प्रकारच्‍या प्रवेश परीक्षा घेतल्‍या जातात. त्‍या प्रवेश परीक्षा स्‍पर्धात्‍मक असतात. जो कोणी अशा परीक्षा उत्‍तम गुणाने उत्‍तीर्ण होतो. तो निश्चित यश प्राप्‍त करु शकतो. यात शंका नाही. प्राथमिक स्‍तरापासून विदयार्थ्‍यांना स्‍पर्धा परीक्षांची गोडी लागावी तसेच अशा परीक्षांविषयी आत्‍मविश्‍वास निर्माण व्‍हावा म्‍हणून या परीक्षांचे आयोजन केले जाते. तसेच यातून विविध प्रकारचे पारितोषिक व मान सन्‍मान तसेच मानधन ही दिले जाते. इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, राष्‍ट्रीय दुर्बल घटक परीक्षा इ. 8 वी. तसेच राष्‍ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा इ. 10 वी. https://www.mscepune.in/ तसेच नवोदय परीक्षा इ. 6 वी. अशा महत्‍वपुर्ण परीक्षांचे आयोजन केले जाते. यातून बुध्दिमान विदया र्थ्‍याला निश्चित फायदा होतो. कोणताही विदयार्थी सुरुवातीपासून बुध्दिमान नसतो तर तो अभ्‍यासाचा नेहमी सराव करुन बुध्दिमान होत असतो. अभ्‍यासातील सातत्‍य हे विदयार्थ्‍याला यशाच्‍या शिखराव पोहचवते.शासकीय योजनांचा लाभ घेण्‍यासाठी शासनाच्‍या विविध स्‍पर्धा परीक्षांमध्‍ये गुणवत्‍ता संपादन करणे गरजेचे असते. शासकीय स्‍पर्धापरीक्षांमध्‍ये यश सहजासहजी मिळत नाही. त्‍यासाठी अभ्‍यासाचे मोठे कष्‍ट घ्‍यावे लागतात. नेहमी स्‍पर्धा परीक्षेचा सराव करावा लागतो. असे केले तर निश्चित यश मिळते.
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग व केंद्रिय लोकसेवा आयोग यांच्‍या मार्फत अनेक शासकीय उच्‍च श्रेणीचे अधिकारी निर्माण करण्‍यासाठी स्‍पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. या परीक्षा उत्‍तीर्ण होऊन उच्‍च अधिकारी होण्‍या पर्यंतचा प्रवास मोठा खडतर असतो. तो प्रवास सुलभ करण्‍यासाठी अगदी लहान वयापासूनच प्रत्‍येकाने स्‍पर्धा परीक्षांकडे वळणे गरजेचे असते. अभ्‍यासात सातत्‍य ठेवले तर प्रयत्‍न वाळूचे कण रगडीता तेल ही गळे  ही म्‍हण खरी ठरते. आज जीवनाच्‍या कोणत्‍याही क्षेत्रामध्‍ये प्रवेश मिळवून एक चांगली नोकरी मिळवायची म्‍हंटल की, तेथे स्‍पर्धा ही आलीच. प्रत्‍येक जण आज टपून बसलाय मला चांगली नोकरी कशी मिळेल म्‍हणून, एक जागा एक हजार उमेदवार अशी जीवघेणी स्‍पर्धा निर्माण झाली आहे. या जीवघेण्‍या स्‍पर्धेत स्‍वत:ला सिध्‍द करण्‍यासाठी अभ्‍यासाचे मोठे श्रम घ्‍यावेच लागतात.
आज मोठया प्रमाणात प्रसारमाध्‍यमे अस्तित्‍वात आहेत. या माध्‍यमामुळे ज्ञान प्राप्‍तीचे मार्ग वाढले आहेत. ज्ञान प्राप्‍त करण्‍याच्‍या कक्षा रुंदावल्‍या आहेत. पण प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचे समायोजन करणे खुप गरजेचे असते. आज ग्रामीण भागत तसेच शहरी भागातही अनेक विदयार्थी असे आहेत की, त्‍यांना स्‍पर्धा परीक्षांचे कसलेच ज्ञान नाही. शासकीय योजनांच्‍या स्‍पर्धा परीक्षांनाही खुप कमी प्रमाणात ग्रामीण तसेच शहरी भागातून विदयार्थ्‍यांचा प्रतिसाद मिळतो. विदयार्थ्‍यांच्‍या अंगी मेहनत करण्‍याची सवय मी झालेली आहे. फक्‍त कक्षा उत्‍तीर्ण होत जाणे एवढेच ध्‍येय आजचा विदयार्थी जपतोय.
विदयार्थ्‍यांने अगदी उत्‍स्‍फुर्तपणे स्‍पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहीजे. जीवानात वस्‍तुनिष्‍ठ ज्ञानाला खुप महत्‍व आहे. ते ज्ञान आत्‍मसात करण्‍यासाठी स्‍पर्धा परीक्षा देणे खुप गरजेचे आहे. सामान्‍य परिस्थितीमध्‍ये जीवन जगणा-या विदयार्थ्‍याने ही स्‍पर्धापरीक्षकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
विदयार्थी बुध्दिमत्‍ता विकास मुल्‍यमापन परीक्षा 
विदयार्थी बुध्दिमत्‍ता विकास मुल्‍यमापन परीक्षा ही अशाच स्‍वरुपाची स्‍पर्धा परीक्षांची एक मालिका आहे. जी विदयार्थ्‍याच्‍या बुध्दिमत्‍तेचे योग्‍य मुल्‍यमापन करून त्‍या विदयार्थ्‍याची गुणवत्‍ता सिध्‍द करून देते. New Institute Of Student Intelligence Development Assessment (NISIDA)  या संस्‍थेव्‍दारे सर्व सामान्‍य विदयार्थ्‍यासाठी परीक्षेच्‍या मालिकेचे पाक्षीक आयोजन करून विदयार्थ्‍याला त्‍याचे निश्चित ध्‍येय प्राप्‍त करून देण्‍यासाठी तत्‍पर आहे. या संस्‍थ्‍ोव्‍दारा आयोजीत विदयार्थी बुध्दिमत्‍ता विकास मुल्‍यमापन परीक्षा  हा उपक्रम महत्‍वपुर्ण आहे. या उपक्रमाकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन सकारात्‍मक व उत्‍साही असला पाहीजे. हा उपक्रम म्‍हणेजे विदयार्थ्‍यांना अभ्‍यासात सातत्‍य ठेवून वस्‍तुनिष्‍ठ ज्ञानाची तयारी करण्‍यासाठी पुरक आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील विदयार्थ्‍यांमध्‍ये अभ्‍यासू वृत्‍ती, जिद्द, चिकाटी निर्माण करणे. कॉपीमुक्‍त परीक्षेला सामोरे जाण्‍याची क्षमता निर्माण करणे, त्‍यांचा बौध्दिक स्‍तर उंचावणे, शालेय स्‍तरावर आयोजीत विविध शासकीय योजनांच्‍या स्‍पर्धा परीक्षांची एक पुर्व तयारी करून घेणे, सर्व सामान्‍य होतकरू विदयार्थ्‍यांना यश प्राप्‍ताचा योग्‍य मार्ग दाखवणे. तसेच विदयार्थ्‍याच्‍या आशा आकांक्षा पल्‍लवीत करून त्‍याला सन्‍मान मिळवून देणे व त्‍याचे भावी आयुष्‍य सुखी व संपन्‍न करणे यास हा उपक्रम पुरक आहे. यात शंका नाही.
प्रत्‍येक पालकाने आपल्‍या पाल्‍याच्‍या शैक्षणिक प्रगतीसाठी कर्तव्‍यदक्ष असले पाहीजे. आजचा विदयार्थी उदयाच्‍या भारताचा आय.ए.एस. असेल, आय. पी. एस. असेल. डॉक्‍टर असेल, इंजिनिअर असेल, एक सक्षम भारत बनवणारा सुजान नागरीक असेल. मग तो कदाचित आपला ही मुलगी- मुलगी असेल. हा विचार मनी बाळगावा.
या ब्‍लॉग च्‍या माध्‍यमातून मी एवढेच सांगू इच्छितो की, आपल्‍या मुलाला- मुलीला एक सुसंपन्‍न जीवन प्राप्‍त्‍ करून देण्‍यासाठी स्‍पर्धा परीक्षांना सामोरे जाण्‍याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. आपली सकारात्‍मकता मुलांचे भावी जीवन समृध्‍द करू शकते. त्‍यासाठी आजच आपल्‍या पाल्‍याचा या स्‍पर्धा परीक्षेच्‍या मालिकेसाठी प्रवेश निश्चित करावा. धन्‍यवाद !!!!  
                                              
                                                                                                                         गणेश एस. चापुुुुलकर


 

Post a Comment

1Comments
Post a Comment