तू यशस्‍वी हो ! परीक्षेविषयी

0

परीक्षेेचे नांव : तू यशस्‍वी हो !

आयोजक :  New Institute Of Student Intelligence Development Assessment (NISIDA)

पात्र इयत्‍ता :  चौथी, पाचवी, सहावी, सातवी

अभ्‍यासक्रम :  संबंधित इयत्‍तेचे सर्व विषय, बुध्‍दीमत्‍ता, चालूघडामोडी, सामान्‍य ज्ञान

परीक्षेचे उद्देश

1. ग्रामीण व शहरी भागातील विदयार्थ्‍यांमध्‍ये अभ्‍यासूवृत्‍ती, जिद्द, चिकाटी निर्माण करणे.

2.विदयार्थ्‍याचा बौध्दिक स्‍तर उंचावणे.

3. विदयार्थ्‍यांमध्‍ये शासकीय स्‍पर्धा परीक्षांना सामोरे जाण्‍याची क्षमता निर्माण करणे.

4. कॉपीमुक्‍त परीक्षेत चांगले यश संपादन करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणे.

5. विदयार्थ्‍यांना नावलौकीक मिळवून देणे.

6. विदयार्थ्‍यांमध्‍ये अभ्‍यास चळवळ निर्माण करणे.

7. विदयार्थ्‍यांना ध्‍येय निश्चितीसाठी प्रोत्‍साहन देणे.

8. विदयार्थ्‍याने आपल्‍या विदयार्थी जीवनात फक्‍त विदयार्जनच करणे योग्‍य आहे. याची  

  जाणिव निर्माण करून देणे.

9.विदयार्थ्‍यांनी अंगी वस्‍तुनिष्‍ठ ज्ञानाची क्षमता निर्माण करणे.

परीक्षेचे स्‍वरुप

1. विदयार्थी बुध्दिमत्‍ता विकास मुल्‍यमापन संस्‍था आयोजित  'तू यशस्‍वी हो !'   ही परीक्षा  विदयार्थ्‍याची आकलन क्षमता पाहणारी असल्‍याने ती सातत्‍यपुर्ण असणारी आहे.  दरवर्षी माहे जुलै ते एप्रिल  या दहा महिन्‍याच्‍या कालावधीत दर महिन्‍याला दोन परीक्षा नियोजन असेल. ( यासाठी परीक्षा वेळापत्रक पाहावे.)

2. ही परीक्षा वस्‍तुनिष्‍ठ स्‍वरुपाची बहुपर्यायी आहे

3. दर महिन्‍याच्‍या नियोजीत परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. सदरील परीक्षा लिंक आपणांस ब्‍लॉग वरील परीक्षा लिंक या टॅब मध्‍ये पाहावयास मिळेल.

4. दर महिन्‍याचा नियोजीत अभ्‍यासक्रम विदयार्थ्‍याने अगदी सुक्ष्‍म पध्‍दतीने अभ्‍यासला 

  पाहीजे. अभ्‍यासाचे नियोजन व परीक्षांचे वेळापत्रक ब्‍लॉगवर उपलब्‍ध आहे. अभ्‍यासक्रम 

  नियोजन जुलै महिन्‍यापासून असले.   परीक्षांचे नियोजन जुलै महिन्‍यापासून  

  करण्‍यात येईल. प्रत्‍येक महिन्‍याला दोन परीक्षा असतील. दर महिन्‍याच्‍या 15 व 30 तारखेला.

5. प्रत्‍येक परीक्षा ही 100 प्रश्‍नांची 200 गुणांची असेल. या प्रश्‍नांमध्‍ये विदयार्थ्‍याच्‍या  इयत्‍तेतील विषयांचा व चालुघडामोडी तसेच सामान्‍य ज्ञान या विषयांचा समावेशस असेल. चालु घडामोडी व सामान्‍य ज्ञान या विषयाचा दर महिन्‍याचा अभ्‍यासक्रम https://nisidacompetitiveexam.blogspot.com/ या NISIDA ब्‍लॉगवर पाहता येईल. तो विदयार्थ्‍याने पाहावा.

6. एकूण 20 परीक्षा घेण्‍यात येतील.20 परीक्षेतील गुणांच्‍या आधारे  विशेष प्राविण्‍य प्राप्‍त म्‍हणून 5% मुलांची निवड केली जाईल. त्‍यांना प्रशस्‍तीपत्र व  इतर सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्‍यात येईल.

7. एकूण 20  परीक्षांचे एकूण 4000 गुण असतील. वार्षिक मुल्‍यमापन 4000 गुणांचे असेल.

8. परीक्षांचे वेळापत्रक स्‍वतंत्र ब्‍लॉगवर उपलब्‍ध आहे.

9.परीक्षा केवळ विदयार्थ्‍यांचा बौध्दिक स्‍तर तपासणारी असल्‍याने ऑनलाईन परिक्षेत गैरमार्गाचा अवलंब करून परीक्षा देणे म्‍हणजे विदयार्थ्‍याने आपला विवेक हरवणे होय. 

परीक्षेचे नियम

1. परीक्षेच्‍या आयेाजनासंबंधीचे सर्व अधिकार व हक्‍क NISIDA या संस्‍थेकडे राखून राहतील.

2.परीक्षेमध्‍ये प्रसंगानुरुप बदल किंवा वेळापत्रकामध्‍ये बदल करण्‍याचा अधिकार संस्‍थेला 

  आहेत.

3.परीक्षा केवळ विदयार्थ्‍याचे ज्ञान वाढवण्‍यासाठी एक सहशालेय पुरक शैक्षणिक उपक्रम 

 आहे. यातुन फक्‍त आपली बुध्दिमत्‍ता किंवा अभ्‍यासाची पातळी विदयार्थ्‍यांना समजून 

 येईल. इतर कोणतेही पारीतोषकाचे, बक्षीसाचे लाभ यातून मिळणार नाहीत. 

4. परीक्षेला प्रविष्‍ठ होण्‍यासाठी नोंदणी करुन विहित शुल्‍क भरल्‍यानंतरच विदयार्थ्‍याचे नांव 

  परीक्षेसाठी ग्राहय धरले जाईल. त्‍यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे.

5. या परीक्षेला महाराष्‍ट्रातील इयत्‍ता ते 7 वी. चे इच्‍छुक विदयार्थी आपले नांव 

  नोंदवू शकतात.

6. परीक्षेला नांव नोंदणी करून शुल्‍क भरल्‍यानंतर ते शुल्‍क नापरतावा असेल. शुल्‍क परत मिळणार नाही.

7.विदयार्थी व पालक यांनी स्‍वंयस्‍फूर्तपणेच या परीक्षेला नोंदणी करावी. ही नोंदणी करणे अथवा न करणे सर्वस्‍वी पालक व विदयार्थी यांच्‍या इच्‍छेवर आहे. परीक्षेला नोंदणी करण्‍यासाठी कोणाचीही व कोणतीही सक्‍ती नाही. परीक्षेच्‍या व्‍यवस्‍थापनावर कोणीही  आक्षेप नोेदवू शकत नाही.  

8. परीक्षेला प्रवेश नोंदणी करताना सर्व माहिती बिनचुक भरावी. सुचना केल्‍याप्रमाणे परीक्षा शुल्‍क ऑनलाईन भरावे. परीक्षा शुल्‍क प्राप्‍त झाल्‍यानंतरच आपली नोंदणी पुर्ण होईल. विदयार्थ्‍याचे नांव, मोबाईल नंबर, परीक्षा शुल्‍क रक्‍कम, परीक्षा शुल्‍क भरल्‍याचा आय.डी. परीक्षा शुल्‍क कोणाच्‍या खात्‍यावरुन भरले त्‍यांचे नांव आणि परीक्षा शुल्‍क भरलेली तारिख या गोष्‍टी परीक्षा प्रवेश नोंदणीसाठी आवश्‍यक आहेत.

9. परीक्षेसंबंधी कोणताही व्‍यवहार हा फक्‍त ऑनलाईन केला जाईल. त्‍यासाठी विदयार्थी व पालक यांना WhatsApp , Internet , Gmail ID यांचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे. सर्व सुचना व मार्गदर्शन हे फक्‍त WhatsApp केले जाणार असल्‍याने तसेच सर्व परीक्षा ऑनलाईन गुगल फॉर्म वर असल्‍याने प्रवेश घेणा-या विदयार्थ्‍यांकडे ANDROID MOBILE असणे गरजेचे आहे. विदयार्थ्‍याने परीक्षेसाठी दर महिन्‍याच्‍या 15 व 30 तारखेला आपणांस पुरविण्‍यात आलेल्‍या लिंकवर जावून आपली परीक्षा दयावी लागेल.

10. केवळ अभ्‍यासातील प्रगती पाहण्‍यासाठीच या परीक्षांचे आयोजन आहे. 

11.  परीक्षेसाठी वेळोवेळी केले जाणारे नियम व अटी लागू राहतील.


 

 
परीक्षेसाठी विदयार्थ्‍यांना मार्गदर्शक सुचना

1.          'तू यशस्‍वी हो !'  ही वस्‍तुनिष्‍ठ स्‍वरुपाची आहे. विदयार्थ्‍याचे वस्‍तुनिष्‍ठ ज्ञान तपासले जाणार असल्‍याने विदयार्थ्‍याने आपल्‍या नियोजीत अभ्‍यासक्रमाचा सुक्ष्‍म व वस्‍तुनिष्‍ठ अभ्‍यास करणे आवश्‍यक आहे.

2.      परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्‍न संबंधित इयत्‍तेच्‍या नियोजीत विषयावर असल्‍याने आपल्‍या अभ्‍यासाची चांगली तयारी होण्‍यासाठी ही परीक्षा खुप महत्‍वाची आहे.

3.      पायाभुत ज्ञान जर चांगल आत्‍मसात केले तर ते पुढील शिक्षणात व आपल्‍या ध्‍येय निश्चितीसाठी खुप महत्‍वाचे ठरते.

4.      विदयार्थ्‍याला आपले ध्‍येय पुर्ण करायचे असेल तर अभ्‍यासाशिवाय तरणोपाय नाही या उक्‍तीला सतत स्‍मरून अभ्‍यास करणे आवश्‍यक असते.

      5.      एकदा आत्‍मसात केलेले ज्ञान चिरकाल टिकवण्‍यासाठी त्‍यामध्‍ये सातत्‍य ठेवणे गरजेचे असते. 

      पुढे पाठ मागे सपाट असे न होऊ देता अभ्‍यास सातत्‍याने करावा. सततच्‍या सरावाने ज्ञानाचे दृढीकरण होते. 

                                

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)